Ad will apear here
Next
पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन
पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. १२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. यानिमित्त पु. ल. कुटुंबीय, कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘एक पुलकित सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कवी मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून उतरलेली आणि पुलंच्या संगीताने सजलेली ‘बिल्हण’ ही संगीतिका सादर करण्यात येणार आहे.

 स्वानंदी क्रिएशनची निर्मिती असलेल्या या संगीतिकेच्या सादरीकरणात गायक संजीव चिम्मलगी, अपर्णा केळकर, केदार केळकर, नेहा गुरव, नीरज गोडसे यांच्यासह मिलींद गुणे, प्रसाद जोशी, आदित्य आपटे आणि अमर ओक सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी आणि कोहिनूर ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती असेल. 

कार्यक्रमाविषयी :
एक पुलकित सकाळ 
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर
दिवस व वेळ : बुधवार, १२ जून २०१९, सकाळी ९ ते ११. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZTJCB
Similar Posts
कशासाठी? पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी - ‘पुलं’चा लेख त्यांच्याच हस्ताक्षरात... पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पु. ल. देशपांडे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. २६ जून १९६८ रोजी या रंगमंदिराचं उद्घाटन झालं. उद्घाटनावेळी पुणे महापालिकेनं ‘नमन नटवरा’ ही स्मरणिका प्रकाशित केली होती. त्या स्मरणिकेत ‘पुलं’नी आपल्या जादुई लेखणीनं लिहिलेला लेख आज (आठ नोव्हेंबर २०२०) त्यांच्या जयंतीनिमित्त येथे प्रसिद्ध करत आहोत
‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित रत्नागिरीत कार्यक्रम रत्नागिरी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आठ नोव्हेंबर २०१८पासून सुरुवात होत आहे. यानिमित्त रत्नागिरीतील आर्ट सर्कल संस्थेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आठ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात
जन्मशताब्दी वर्षानिमित्त जागतिक पातळीवर ‘पुलोत्सव’ पुणे : ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा ‘पुलोत्सव’ जागतिक पातळीवरही साजरा होणार आहे. पुण्यासह देशातील २० शहरे आणि देशाबाहेरील पाच खंडांमधील ३० शहरांत हा ‘ग्लोबल पुलोत्सव’ येत्या आठ नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे,’ अशी माहिती ‘पुलं’च्या परिवारातील
माझे जीवनगाणे सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language